Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्क नाही घातला तर थेट वाहनचालकाला दंड

/if-passenger
, गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (08:09 IST)
नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच. लसीकरणाची गती संथ झालीय. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसवा म्हणून प्रशासन आक्रमक झाले आहे. प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे.कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाला दंड करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या 2 लाख 62 हजार 265 कार आणि जीप आहेत. तर 6 हजार 772 टॅक्सी आहेत. शिवाय 27 हजार 796 रिक्षा आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाने मास्क घातला नसेल, तर त्या टॅक्सीचालक अथवा रिक्षाचालकाला पोलीस जबाबदार धरून दंड ठोठावू शकतात. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. नवा मास्क नसेल, तर लागलीच दंड बसण्यापूर्वी खरेदी करा.
दुसरीकडे नाशिक महापालिका हद्दीत एखाद्या दुकानात ग्राहक विनामास्क आला, तर दुकानदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे. असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे.गेल्या आठवड्यात जवळपास 22 नागरिकांकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘निडल फ्री’ लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्याची निवड