भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घालत असल्याचा करू केला. या आरोपाला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय होत असल्याचं त्यांना सांगितलं कोणी? जर त्यांना त्यांच्या गुप्तहेरांनी ही माहिती दिली असेल तर ती चुकीची दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही जनतेत संभ्रम निर्माण का करत आहात?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.