Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नोटा मोजायला वेळ मिळतो, तर हेही काम करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मेडिकल धारकांची कानउघडणी

नोटा मोजायला वेळ मिळतो, तर हेही काम करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली  मेडिकल धारकांची कानउघडणी
, शनिवार, 22 जानेवारी 2022 (21:03 IST)
कोरोनाचा वाढता पार्दुभव पाहता खेळाडूंची होणारी गैरसोय, नागरिकांसाठी देवस्थान दर्शनाची अनुमती आणि पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महिती दिली आहे.
 
तसेच पवारांनी कोरोना टेस्टची किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर नोंद ठेवण्यात वेळ जात असतो, अशी मेडिकल स्टोअर्स चालकांची तक्रार असून त्याची माहिती सुद्धा दिली आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
 
खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी.
 
लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. कोरोना टेस्टची किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर नोंद ठेवण्यात वेळ जात असतो, अशी मेडिकल स्टोअर्स चालकांची तक्रार आहे, असे पवार यांच्या निदर्शनास मीडियाने आणून दिले.
 
त्यावर, त्यात स्टोअर्स चालकांना वेगळी काय माहिती घ्यायची आहे. माहिती म्हणजे केवळ नंबर घ्यायचे आहेत. नोटा मोजायला कसा वेळ मिळतो. नोटा मोजेपर्यंत दहाआकडी नंबर लिहून होतो, असं सांगतानाच किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर लिहून ठेवणे बंधनकारक ठेवायलाच पाहिजे, असे पवार यांनी सांगितले आहे.
 
शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांशी नागरीक घरीच उपचार घेत असले तरी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयानाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात.
 
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे.
 
महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

’कोविडमुक्त गाव’अभियान पुणे विभागातही राबवावे