औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद सुरूच आहे. यात आता गुगलची भर पडली आहे. गुगल सर्च केल्यावर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर दिसतंय. आता या विरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यानंतर विरोधी पक्षांकडून राजकीय विरोध पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता नव्याने आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत औरंगाबाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. '
किमान 12 मंत्री आवश्यक असताना औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय दोघांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच तो पुढे केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर अधिकृत नामांतर होईल, असा कायदा आहे. मात्र गुगलने ज्या प्रकारे आधीच जाहीर केलंय, त्याविरोधात गुगलची पक्षाच्या वतीने कायदेशीर तक्रार करणार आहोत असं एमआयएमचे डॉ. गफफार कादरी यांनी सांगितलं.