Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवा

Immediately stop the injustice being done to Marathi speakers in the border areas Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:11 IST)
सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा,अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
 
“मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव कारवार, बिदर,भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत”असेही पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे.“सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे.सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल,”अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
 
“सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत”,असे पवार म्हणाले.
 
“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी,” शी विनंती अजित पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुजबळ काका पुतण्याची सत्र न्यायालयात धाव