कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी भूगोल विषयाचा पेपर रद्द केला आहे. या विषयाच्या विद्यार्थांना गुणदान करण्याबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थाने दिलेल्या अन्य विषयाच्या लेखी परीक्षेस प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर रद्द केलेल्या विषयाच्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. भूगोल विषयाच्या परिक्षेसह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षाही रद्द करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनाही या विषयासाठी सरासरी गुण देण्यात येणार आहेत.