Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मैत्रीतुन पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर !

मैत्रीतुन पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर !
अहमदनगर , सोमवार, 24 मे 2021 (16:16 IST)
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. तो मृत्यदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार याठिकाणी हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही युवकांनी सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं सराफाला बोलावून त्याची निर्घृण हत्या केली आहे.
 
स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या काही तासांतच हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. संबंधित आरोपींनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शिरूर कासार पोलीस करत आहेत.
 
विशाल कुलथे (वय -25) असं हत्या झालेल्या सराफा व्यापाऱ्याचं नाव आहे. तर ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड असं मुख्य आरोपीचं नाव असून त्याचं शिरूर कासारमध्ये एक सलूनचं दुकान आहे.
 
संबंधित आरोपीनं मृत विशालकडून अनेकदा सोनं खरेदी केली होतं. त्यामुळे मृत विशाल आणि आरोपी ज्ञानेश्वर यांच्यात मैत्रीचं नात होतं. पण यावेळी ज्ञानेश्वरनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं सराफा व्यापारी विशाल कुलथे याचा काटा काढला आहे.
 
याबाबत शिरूर कासारचे पोलिस निरिक्षक सिध्दार्थ यांनी सांगितले की, शिरुर कासार येथील सोनार विशाल सुभाष कुलथे (वय २५) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनाराचा खून करण्यात आला आहे.
 
अधिक माहिती घेवुन त्याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलु लागला.
 
व गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण दाखविण्यात आले. शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट नंबर ४२९/१/१ मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
 
ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार विशाल सुभाष कुलथे यांच्याशी संपर्क केला. माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले.
 
त्यामुळे जास्त सोन करायचे आहे असे सांगून आँर्डर देण्यात आली. दुकानातील तयार असलेले सोने घेवून माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला. कुलथे सोने घेवून सलुन दुकानात गेला. व त्याच ठिकाणी त्याचा घात झाला.
 
शेवगाव पोलिस, शिरूर पोलिस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड पसार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले. पुढील तपास चालू आहे. शिरूर कासार येथील विशाल सुभाष कुलथे यांचे अवघ्या सहा महिन्यापुर्वीच लग्न झाले होत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खग्रास चंद्रग्रहण कसं होतं? ग्रहणांचे किती प्रकार आहेत?