Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदल व विस्तार?

Webdunia
गुरूवार, 16 मे 2019 (15:00 IST)
लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काहीदिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही 'आयाराम' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.
 
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
 
राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खाते काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. मात्र पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीत डावललेल्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments