Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जत तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…रात्रीतून अनेक घरे फोडली

In Karjat taluka
, मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (15:31 IST)
अहमदनगर :- कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चार ठिकाणी कुलपे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
यामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आसिफ सय्यद यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व रोख रक्कम व इतर साहित्य चोरट्याने चोरून नेले.
तसेच मोहन तांबे यांच्या घराचे कुलूप तोडून सामानाची उचकापाचक करून त्यांच्या घरातील काही साहित्य चोरून नेले आहे. त्याच्या शेजारी असलेल्या दत्तदिगंबर पतसंस्थेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साहित्याची उचकापाचक केली.
दोन मोटारसायकलवर पाच ते सहा जण चोरटे असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राजेंद्र डुबल यांनी दिली. प्रसाद पवार यांच्या कृषी सेवा केंद्रांचे कुलुप तोडले.
सचिन गोरख ढाेबे यांच्या घराचे कुलूप तोडून सामानाची उचकापाचक केली. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी तातडीने या चोरीच्या घटनांचा शोध लावावा व शहर परिसर गुन्हेगारी मुक्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीपेक्षा मुंबईची हवा जास्त विषारी? धोकादायक पातळीवर प्रदूषण