Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकात पतीने बनवला पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडीओ, डान्सबार मध्ये नाचवलं

rape
, शनिवार, 2 ऑगस्ट 2025 (14:38 IST)
नाशिकमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि नंतर तिला डान्स बारमध्ये नाचायला भाग पाडले.
 
पती-पत्नीचं नातं हे विश्वास, समर्पण आणि सुख-दु:खात एकमेकांसोबत राहण्यावर आधारित असतं. ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात, एकमेकांची काळजी घेतात आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करतात पण नाशिकात या नात्याला काळिमा फासली आहे. 
ALSO READ: फडणवीस यांच्या आयआयएम-एन परिषदेत पंतप्रधान मोदींच्या प्रशासन मॉडेलचा वापर केला जाणार
सदर घटना नाशिकातील पंचवटी भागातली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पत्नीला डान्सबार मध्ये नाचायला बाध्य केले. आरोपी पतीने आपल्या पत्नीला प्रथम सोलापूरमध्ये आणि नंतर बेंगळुरूमध्ये सतत 2 वर्षे डान्स बारमध्ये नाचण्यास भाग पाडले .
पतीचा अत्याचार असह्य झाल्यावर पीडितेने त्याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. पीडितेने नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ALSO READ: कोकाटे यांच्यावरील कारवाईनंतर मंत्री कदम यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव
पंचवटी पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.पोलिसांनी पीडितेचा पती आणि त्याच्या मित्राला अटक केली असून त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ALSO READ: मंत्रिमंडळात आता कोणताही बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना मोठा इशारा दिला
पंचवटी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, आरोपी सध्या फरार आहे.त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या