Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांगलीत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या करून मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवले

murder
, शनिवार, 29 मार्च 2025 (09:47 IST)
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मांगले येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. दारूच्या नशेत एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवले.
प्राजक्ता मंगेश कांबळे असे या मयत महिलेचे नाव आहे. तिच्या आरोपी पतीने स्वतःला पोलिसांसमोर स्वाधीन केले. मंगेश असे या आरोपी पतीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेशचा भाऊ आणि आई मांगले-वारणा नगर रोड वरील एका घरात भाड्याने राहतात. चार दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी मुलगा आणि मुलगी मुंबईहून आईच्या घरी राहायला आले.एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंगेशचा भाऊ आणि आई देववाडीला गेले होते. मंगेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.  तिथे मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला आणि मंगेशने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. 
नंतर प्राजक्ताच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि एका विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवले. आणि पेटीला हाकून दिले. नंतर खोलीला कुलूप लावून भावाला फोन करून तो शिराळ्याला जात असल्याचे सांगितले. 

मंगेशचा भाऊ देववाडीतून परत आल्यावर मंगेशच्या मुलाने काकाला रडत रडत सांगितले की आई वडिलांमध्ये भांडण झाले आणि पप्पाने आईला मारहाण केली आणि खोलीत नेले. नंतर मंगेशच्या भावाने त्याला कुठे आहेस असे विचारणा केल्यावर मी गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ आहे. 

मंगेशच्या भावाने आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला घरी बोलावले.नंतर मंगेशला पुन्हा कुठे आहे असे विचारले त्याने गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले. तिघांनी त्याला मंदिराजवळ जाऊन घडलेले सर्व विचारले. 
मंगेशने गुन्हा केल्याची कबुली दिली. मी प्राजक्ताचा खून केला असून तिचे मृतदेह शेजारच्या खोलीत डांबुन ठेवला असल्याचे सांगितले. त्यांनी मंगेशला स्वतःला पोलिसांच्या शरण जाण्यास सांगितले. नंतर मंगेश पोलीस ठाण्यात गेला आणि गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केदारनाथ धाममध्ये मोबाईल आणि केमेऱ्यावर बंदी, मंदिर समितीने केले कडक नियम