Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिडकोत बापाचाच कन्येवर बलात्कार तर आडगावला खासगी सावकाराकडून महिलेचा विनयभंग

Webdunia
गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (21:58 IST)
नाशिक  – नाशिक शहर परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिला शहरात असुरक्षितच असल्याचे स्पष्ट होत आहे. आज दोन गंभीर प्रकार उजेडात आले आहेत. सिडकोत जन्मदात्या बापानेच मुलीवर बलात्कार केल्याचे निदर्शनास आले आहे. तर, औरंगाबादरोड परिसरात खासगी सावकाराने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला आहे. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 
डीजीपनगरमध्ये जन्मदात्या बापाचा कन्येवर बलात्कार
बापलेकीच्या पवित्र नात्यास काळीमा फासल्याची घटना नाशकात समोर आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर निर्दयी पित्याने तब्बल सहा वर्ष बळजबरीने बलात्कार केला असून, संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिडकोतील डीजीपीनगर भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आहेर (४६) असे संशयित पित्याचे नाव असून तो कारखाना कामगार आहे. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा संशयिताचा परिवार असून,हालाखिची परिस्थीती असल्याने पत्नीही मिळेल ते काम करून संसारास हातभार लावते. १ जानेवारी २०१६ रोजी पिडीतेचे लहान भाऊ, बहिण शाळेत तर आई कामावर गेलेली असतांना संशयिताची नजर आपल्या पोटच्या मुलीवर पडली. १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत त्याने दमदाटी करीत बळजबरीने कुकर्म केले. इप्सित साध्य होताच संशयिताने पिडीतेस वाच्यता केल्यास बदनामी होईल अशी भिती घातल्याने मुलीने कुणालाही काही एक सांगितले नाही. मात्र त्यानंतर संशयिताची मागणी वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली आहे. रात्रपाळीची सेवा बजावून आल्यानंतर दिवसा मुलीवर तो लैंगिक अत्याचार करीत होता. पत्नी लहान मुलांना शाळेत सोडून कामानिमित्त घराबाहेर पडल्याची तो संधी साधत होता. गेली सहा वर्ष बाविसी पार केलेल्या मुलीवर तो अत्याचार करीत होता. बापलेकीच्या पवित्र नात्यास संशयित वारंवार काळीमा फासू लागल्याने अखेर बापाच्या कृरकर्माचा पिडीत मुलीने भांडाफोड केला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बिडकर करीत आहेत.
 
औरंगाबादरोडवर खासगी सावकाराची गुंडागर्दी
आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांनी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना औरंगाबादरोड भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर येथील एकास अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने खासगी सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 
निखील अशोक शहा व हर्षद कृष्णा केसेकर (रा.दोघे मालदाडरोड,संगमनेर जि.अ.नगर) अशी संशयिताची नावे असून केसेकर यास पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद रोडवरील इंदू लॉन्स भागात राहणाºया २२ वर्षीय विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिडीतेचे कुटूंबिय आणि संशयित शहा यांच्या ामध्ये आर्थिक व्यवहार आहे. बुधवारी (दि.७) रात्री महिला घरी एकटी असतांना ही घटना घडली. शहा रात्रीच्या वेळी मित्र केसेकर यास सोबत घेवून आला होता. सासरच्या मंडळीने घेतलेल्या पैश्यांच्या जुनी देणी घेणीच्या वादाची कुरापत काढून त्याने हे कृत्य केले. तुझा नवरा नाही तर तू मला चालेल असे म्हणत त्याने विवाहीतेचा विनयभंग केला. तर दुसºया संशयिताने महिलेस व कुटूंबियास शिवीगाळ करीत घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. महिलेने गांभिर्य ओळखून तात्काळ पोलिसात धाव घेतल्याने पोलिसांनी संशयित हर्षल केसकर यास बेड्या ठोकल्या असून शहा पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधूचा जपान मास्टर्सच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: संभाजी महाराजांना मानणारे आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांमध्ये चुरशीशी स्पर्धा, छत्रपती संभाजी नगर मध्ये मोदींची गर्जना

संभाजी महाराजांना मानणारे आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांमध्ये चुरशीशी स्पर्धा, छत्रपती संभाजी नगर मध्ये मोदींची गर्जना

‘बंटेंगे तो कटेंगे’ वरून महाराष्ट्रात खळबळ उडाली, अजित- पंकजा यांच्यानंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

UPPSC विद्यार्थ्यांसमोर नतमस्तक, आता परीक्षा एका दिवसात एकाच शिफ्टमध्ये होणार

पुढील लेख
Show comments