Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोलापुरात मालगाडीचं इंजिन थेट शेतात

The engine of a goods train going from Solapur towards Pune derailed in a field at Kem in Karmala taluka
, रविवार, 4 सप्टेंबर 2022 (15:16 IST)
करमाळा तालुक्यात केम येथे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचं इंजिन रुळावरून घसरून शेतात गेल्याचा अपघात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला असून रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचे कारण नेमके अद्याप कळू शकले नाही. तपास केल्यावर अपघाताचे कारण समोर येण्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणाऱ्या एका मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरून थेट शेतात घुसले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. इंजिनचे ब्रेकफेल होऊन हा अपघात झालेला असल्याची शक्यता प्राथमिक माहितीतून मिळत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 8 सप्टेंबरला येणार, वैशिष्टये जाणून घ्या