Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैजापुरात प. संगीताताई महाराज पवार यांची आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या

murder
, शनिवार, 28 जून 2025 (12:29 IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील चिंचवडगाव शिवारात प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प  संगीताताई महाराज पवार(44) यांच्या आश्रमात शिरून अज्ञात हल्लेखोऱ्याने दगडाने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव शिवारातील आश्रमात संगीता ताई गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यात सक्रिय असून त्यांचे कीर्तन आणि सामाजिक कार्य सुरु होते. मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने आश्रमात शिरकाव करून त्यांच्यावर दगडाने ठेचून हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर स्थानिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. 
ALSO READ: अहिल्यानगरमध्ये तीन बेकायदेशीर बांग्लादेशींना अटक
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळाचा तपास करत पुरावे एकत्र करण्यास सुरु केले. श्वान पथकाने देखील तपास केल्यावर मारेकऱ्याचा सुगावा मिळालेला नाही. पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरी रथयात्रेत भगवान बलभद्र यांचा रथ अडकला, 600हून अधिक लोक जखमी