Dharma Sangrah

वैजापुरात प. संगीताताई महाराज पवार यांची आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या

Webdunia
शनिवार, 28 जून 2025 (12:29 IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील चिंचवडगाव शिवारात प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प  संगीताताई महाराज पवार(44) यांच्या आश्रमात शिरून अज्ञात हल्लेखोऱ्याने दगडाने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
ALSO READ: बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोचिंग सेंटरच्या दोन शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव शिवारातील आश्रमात संगीता ताई गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यात सक्रिय असून त्यांचे कीर्तन आणि सामाजिक कार्य सुरु होते. मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने आश्रमात शिरकाव करून त्यांच्यावर दगडाने ठेचून हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर स्थानिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. 
ALSO READ: अहिल्यानगरमध्ये तीन बेकायदेशीर बांग्लादेशींना अटक
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळाचा तपास करत पुरावे एकत्र करण्यास सुरु केले. श्वान पथकाने देखील तपास केल्यावर मारेकऱ्याचा सुगावा मिळालेला नाही. पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: आंबोली पॉइंटवर सेल्फीच्या नादात पर्यटक खोल दरीत कोसळला

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

ब्राह्मण मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या IAS अधिकारी संतोष वर्मा यांचा चेहऱ्याला काळे फासणाऱ्यला ५१,००० रुपयांचे बक्षीस जाहीर; ब्राह्मण संघटनांनी केला निषेध

गृहपाठ न केल्याबद्दल निष्पाप मुलाला झाडावर लटकवण्यात आले, शाळेत भयानक शिक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला दिली धडक; महिलेचा मृत्यू तर पती आणि मुलींची प्रकृती गंभीर

LIVE: पुण्यात दोन दिवसांत दोन ठिकाणी बिबट्या दिसला

२०३२ पर्यंत मुंबईची प्रतिमा बदलेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केली भव्य वाहतूक योजना

पुढील लेख
Show comments