Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्ह्यातील घटना लाच,घेताना ग्रामसेवक व महिला सरपंचाच्या पतीस रंगेहाथ पकडले

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (08:09 IST)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे चार हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक व महिला सरपंचाच्या पतीला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे व महिला सरपंचाचे पती शिवदास भुरा राठोड असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
 
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे रोजगार हमी योजना राबवली जाते. या योजनेच्या मानधन आदेशावर सही घेण्यासाठी तक्रारदार काशिनाथ सोनवणे आणि सरपंचाकडे गेले होते. परंतु, या आदेशावर सही करण्यासाठी सोनवणे आणि महिला सरपंचाचे पती शिवदास राठोड यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची लाच मागितली असता तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबतची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचत सोनवणे आणि राठोड यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

AIMIM मुंबईत 24 जागांवर उमेदवार उभे करणार

मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी बदलली, 18 सप्टेंबरला Eid-e-Milad ची सार्वजनिक सुट्टी

जालना लाठीचार्जवेळी मनोज जरांगे पळून गेले होते, छगन भुजबळांनी केला मोठा दावा

निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष नड्डा यांनी मुंबई गाठली, लालबागच्या राजाला भेट दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ खडसेंच्या पुनरागमनाचा निर्णय गणेशोत्सवानंतर घेतला जाईल

पुढील लेख
Show comments