Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौथ्या दिवशी औरंगाबादेतून आयकरचे पथक रवाना

The residence and office of entrepreneur Satish Vyas in Aurangabad was also continuously being investigated and investigated for the past three days
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:42 IST)
मध्यान्ह भोजन गैरव्यवहारात देशभरातील ५० हून अधिक संशयितांच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाने मागील बुधवारी छापेमारी केली होती. त्यातील एक औरंगाबादेमधील उद्योजक सतिश व्यास यांचे निवासस्थान व कार्यालयातही मागील तीन दिवसांपासून सलग चौकशी व तपासणी सुरु होती. आज शुक्रवारी दुपारी ही तपासणी संपली. जयपूर, पुणे, नाशिक येथील अधिकाऱ्यांचे पथक शहरातून रवाना झाले.

या छापेमारीची चर्चा शहरात मागील तीन दिवसांपासून चर्चीली जात होती. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. कारण, व्यास परिवार हा राजकारण, समाजकारण, धार्मिक कार्यात पुढे आहे. तसेच उद्योग व्यवसायातही या परिवाराने आघाडी घेतली आहे. या परिवाराच्या निवास्थानी व कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारीमुळे शहरात चर्चेला उधाण आले होते. काही अफवाही यानिमित्ताने पसरल्या.
 
उल्लेखीनय म्हणजे आयकर विभाग छापे टाकताना स्थानिक पोलीसांना सोबत नेत असते, पण प्रथमच जयपूर येथून आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान आणण्यात आले होते. उद्योजक व व्यावसायिकांमध्ये याचीच जास्त चर्चा होती. तीन दिवसांपासून तपासणी सुरू असल्याने ही चर्चा आणखी रंगत गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य