Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्य विद्यापीठातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारा मिळणार माहिती

Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (21:47 IST)
विद्यापीठ परिसारातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेले क्युआर कोडव्दारा सर्वसामान्यांना वनस्पतींचे औषधी महत्व व माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रकाराचे वनस्पती, वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सदर वृक्षांना जीओ टॅगींग व क्युआर कोड लेबल लावण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लेफ्टनन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ परिसरास भेट देणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांना वनसंपदेची माहिती होण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने क्युआर कोड तयार करण्यात आले आहेत. स्मार्ट फोनव्दारा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर वनस्पती, वृक्षाची जीओ टॅगींगव्दारे स्थान, वनस्पतीचे शास्त्रीय नांव, मराठी नांव, परिसरातील वनस्पतींची संख्या, औषधी महत्व आदी माहिती उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी व अभ्यागतांना वनस्पतींचे औषधी महत्व समजेल. पर्यावरण संवर्धनाबरोबर वनस्पतींची ओळख व माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचा जीओटॅगींग व क्युआर कोड उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
 विद्यापीठाचे ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत परिसरात विविध प्रकारातील फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आदींची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वनस्पती व वृक्षांची ओळख व माहिती सर्वांना व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसारात व संलग्नित महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे.
 
वृक्षलागवडीबरोबर त्यांची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. क्युआर कोडच्या माध्यतातून वनस्पतींचे महत्व व माहिती देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे.  याप्रसंगी हर्बल गार्डनच्या देखभाल करणारे श्री. नंदु सोनजे, श्री. संतोष केदार यांचा सत्कार मा. कुलगुरु महोदया व लेफ्टनन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ब्रिग.डॉ. सुबोध मुळगुंद, श्री. श्रीधर चितळे, डॉ. उदयसिंह रावराणे, श्री. संजय मराठे, अॅड. संदीप कुलकर्णी, श्री. वाय.जी.पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. संदीप राठोड, श्री. महेश बिरारीस, श्री. निलेश ओहळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठ हरित कक्षाचे  क्युआर कोडसंदर्भात डॉ. प्रदीप आवळे, श्री. रत्नाकर काळे यांनी कार्यवाही केली आहे.         
 
विद्यापीठास बजाज इलेक्ट्रिकल फांऊन्डेशनकडून सहा हजार दोनशे रोपे प्राप्त
 
विद्यापीठ परिसारातील ‘हर्बल गार्डन’ मध्ये विविध प्रकारचे वनस्पती व वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याकरीता विद्यापीठास सहा हजार दोनशे रोपे मे. बजाज इलेक्ट्रिकल  फांऊन्डेशन यांच्याकडून कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सी.एस.आर.) व्दारा प्राप्त झाली आहेत अशी माहिती विद्यापीठ हरित कक्षाचे प्रमुख तथा उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी दिली. यामध्ये पेरु, जांभूळ, कांचन, बकुळ, चिकु, आवळा, अर्जुन, सिताफळ, करंज, सप्तपर्णी, फणस, बदाम, चित्रक, कुपी आदी विविध प्रकारातील रोपांचा समावेश आहे. विद्यापीठात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची मे. बजाज इलेक्ट्रिकल फांऊन्डेशनचे पदाधिकारी यांनी नुकतीच पहाणी केली. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांच्या मदतीने परिसारात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षांचे संवर्धन व जतन करण्याचा संदेश विद्यापीठाकडून सर्वांना देण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भाजप काय करत आहे, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे शर्यतीतून जवळपास बाहेर

History of Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण इतिहास, वसंत नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्त्याला लाथ मारतांनाचा व्हिडिओ व्हायरल

भारत कॉकसचे प्रमुख माइक असणार वॉल्झ ट्रम्पचे सुरक्षा सल्लागार

पुढील लेख
Show comments