भारतीय संघाचा सलामीवर सलामीवीर ईशान किशननं बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावलं आहे. त्याचं हे वनडेतील पहिलं द्विशतक आहे. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन चौथा भारतीय तर सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. याआधी हिटमॅन रोहित शर्माने 3 तर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी एक द्विशतक झळकावलं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या तिघांव्यतिरिक्त ख्रिस गेल,मार्टिन गप्तील,फखर झमन यांच्या नावावर द्विशतक आहे.
वनडे क्रिकेटमधलं हे दहावं वैयक्तिक द्विशतक आहे.
आयपीएल स्पर्धेत गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटी रुपये खर्च करून इशानला ताफ्यात समाविष्ट केलं होतं.
भारताचा सलामीवीर ईशान किशनने बांगलादेशविरुद्ध 210 धावांची खेळी केली आहे. त्याचं हे वनडेतील पहिले द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम इशाननं आपल्या नावावर केला आहे. इशानने आपल्या खेळीत 131 चेंडूंमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याला तस्किन अहमदनं बाद केलं.
ईशानचं हे वनडेतील पहिले द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम ईशाननं आपल्या नावावर केला आहे. ईशानने आपल्या खेळीत 131 चेंडूंमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याला तस्किन अहमदनं बाद केलं.
Published By- Priya Dixit