Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नाशिकच्या ईश्वरी सावकारची बीसीसीआयच्या एनसीए कॅम्पसाठी निवड

cricket
, मंगळवार, 3 मे 2022 (20:57 IST)
नाशिकच्या शर्विन किसवे पाठोपाठ ईश्वरी सावकारची देखी मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरू तर्फे देशभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी १६ मे ते ९ जून दरम्यान हे शिबीर होणार आहे. मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात एकूण ५ संघ निवडले गेले असून ई संघातील ईश्वरी सावकारची राजकोट येथे होणार असलेल्या शिबीरासाठी निवड झाली आहे. ईश्वरी प्रमाणेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आणखी ५ मुलींची निवड या १९ वर्षांखालील वयोगटातील शिबीरासाठी निवड झाली आहे.
 
सलामीवीर ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे, जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीच्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या सगळ्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती.या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; औरंगाबाद पोलिसांची कारवाई