पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच मिळाले नसून दिवंगत पती रमेश लटके यांचा विक्रमही त्यांनी मोडला आहे. या निवडणुकीत नोटालाही जास्त मिळाली. नोटाला १२ हजारांपेक्षा अधिक मत मिळाली आहेत, यावरुन आताल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नोटाल मिळालेली मतं ही भाजपचीच असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली. तसेच, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी नोटाला मिळालेल्या मतावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर, भाजप नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार लटके 66 हजारांच्या वर मते घेत निवडून आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत नोटाला 12 हजारांच्या वर मते मिळाली आहेत. भाजपने ही मते पैशाने फिरवली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, नोटाला मिळालेली मते भाजपने फोडली म्हणणे चुकीचे आहे, या मतांची टक्केवारी पाहता सर्व पक्षांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे सामंत यांनी म्हटले. तसेच, मी लटके यांचे अभिनंदन करतो, असेही सामंत म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor