Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगाव : पोलीस पथकावर काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू

A tree fell on his vehicle near Anjani Dam
, शुक्रवार, 30 जून 2023 (10:01 IST)
काळ कधी आणि कुठून झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. जळगावहून एरंडोल कासोदाकडे गुन्ह्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी निघालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर काळाने झडप घातली आणि या पथकाच्या वाहनावर अंजनी धरणाजवळ झाड कोसळलं. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वाहन चालकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदर्शन दातीर आणि अजय चौधरी असे मृतांची नावे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हेचे पथक पिलखोड येथे एका प्रकरणाची चौकशी करायला जात असताना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अंजनी धरणाजवळ त्यांच्या वाहनावर झाड कोसळलं या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील इतर 3 पोलीस कर्मचारी चंद्रकांत शिंदे, भरत जेठवाणी निलेश सूर्यवंशी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळ पोहोचले आणि स्थनिकांच्या मदतीने जखमी पोलीस कर्मींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलापुरात ईदगाह बाहेर पाकिस्तानी फुग्यांची विक्री; सूत्रधारांना अटक