Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : कोणी मारली बाजी? महाजन गट वरचढ ठरले की खडसे गट? बघा, संपूर्ण निकाल

girish mahajan khadse
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:26 IST)
संघात गिरीश महाजन गटाने २० पैकी १६ जागा जिंकल्या; खडसे गटाला अवघ्या ४ जागा
 
जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसला आहे. २० जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले तर खडसे यांच्या सहकार पॅनलचे अवघे ४ उमेदवार निवडून आले. यात आ. अनिल भाईदास पाटील, छाया गुलाबराव देवकर, पराग मोरे, माजी आ. दिलीप वाघ यांचा समावेश आहे. तर इतर विजयी उमेदवार हे महाजन गटाचे आहे. या निवडणुकीत संजय पवार सर्वाधिक तर आमदार चिमणराव पाटील सर्वात कमी मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
तर जाणून घेवूया तालुका मतदार संघ निहाय कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते!
 
अमळनेर : अनिल भाईदास पाटील (विजयी, २४६), स्मिताताई उदय वाघ (१८४), ११ मते अवैध
भडगाव : भोसले रावसाहेब प्रकाश (विजयी २३३), पाटील डॉ.संजीव कृष्णराव (२००), ८ मते अवैध
भुसावळ : झांबरे शामल अतुल (विजयी,२६३ ) ,ढाके शालिनी मधुकर (१६९), ९ मते अवैध
बोदवड : पाटील रवींद्र प्रल्हादराव (२१६), राणे मधुकर रामचंद्र (विजयी, २२०), ५ मते अवैध
चाळीसगाव : पाटील प्रमोद पाडुरंग (विजयी, २४७), पाटील सुभाष नानाभाऊ (१८८), ६ मते अवैध
 
चोपडा : निकम रोहित दिलीप (विजयी, २६९), पाटील इंदिराताई भानुदास (१६४), ८ मते अवैध
धरणगाव : पाटील वाल्मिक विक्रम (१६७), पवार संजय मुरलीधर (विजयी २६९), ५ मते अवैध
एरंडोल : चौधरी दगडू धोंडू (विजयी,२३०), जैन भागचंद्र मोतीलाल (२०५), ६ मते अवैध
जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील (विजयी, २७५), महाजन मालतीबाई सुपडू (१६२), ४ मते अवैध
जामनेर : महाजन गिरीश दत्तात्रय (विजयी २७६), पाटील दिनेश रघुनाथ (१५८), ७ मते अवैध
मुक्ताईनगर : चव्हाण मंगेश रमेश (विजयी२५५), खडसे मंदाकिनी एकनाथ (१७९), ७ मते अवैध
 
पारोळा : पाटील चिमणराव रुपचंद (विजयी, २२७), पाटील सतीश भास्कर (२०८), ६ मते अवैध
रावेर : बढे जगदीश लहू (१७०), पाटील ठकसेन भास्कर (विजयी,२६६), ५ अवैध मते
यावल : चौधरी हेमराज खुशाल (१६८), चौधरी नितीन नारायण (विजयी,२६०), १३ मते अवैध
एनटी मतदार संघ : देशमुख अरविंद भगवान (विजयी,२५९), पाटील विजय रामदास (१७९), ३ मते अवैध
एससी मतदार संघ : ब्रम्हे श्रावण सदा (१६१), सावकारे संजय वामन (विजयी, २७६), ४ मते अवैध
 
इतर मागास वर्ग मतदार संघ : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (२०७), मोरे पराग वसंतराव (विजयी २३०), ४ मते अवैध
महिला राखीव मतदार संघ : देवकर छाया गुलाबराव (२३५), पाटील पूनम प्रशांत (२५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालत्या कॅबमध्ये महिलेचा विनय भंग, 10 महिन्याच्या मुलीला चालत्या कॅब मधून फेकले