Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन दिवसापासून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता छोट्या भावासह बेपत्ता

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (14:05 IST)

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल छोट्या भावासह बेपत्ता झाला आहे. निलेशची आई सुंदरबाई रेवाराम भिल यांनी 19 मे रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.  निलेश भिल हा जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहतो.   निलेश भिल आणि त्याचा भाऊ गणपत भिल 17 मे रोजी बेपत्ता झाले. निलेश रेवाराम भिल हा 12 वर्षांचा असून त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल 7 वर्षाचा आहे.  30 ऑगस्ट 2014 रोजी मुक्ताई मंदिरासमोर भाविकांसाठी तयार केलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलगा पाय घसरुन पडला. त्यावेळी निलेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. काही मिनिटातच भागवतला पाण्यातून सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. या धाडसाबद्दल निलेशला 26 जानेवारी 2016 ला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments