महाराष्ट्राला हादरविणारी घटना जळगावच्या सरकारी रुग्णालयात घडली असून येथे एका ८० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह हॉस्पिटलच्या बाथरूमममध्ये सापडला. ही महिला २ जूनपासून बेपत्ता होती.
हॉस्पिटलमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असून लोकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणामुळे हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणाचा कळस गाठण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
माहितीनुसास ही महिला १ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती बेपत्ता झाल्याची माहिती आली होती. जेसीएच अधिकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती. ही वृद्ध महिला २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
ज्यावेळी रुग्णालयाच्या बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ही बाब उघड झाली की, कोरोनाबाधिक वृध्द महिलेचा मृतदेह शौचालयात पडला होता. ही वृ्द्ध महिला भुसावळ शहरातील रहिवाशी होती.