Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव : ६५ प्रवाशांसह सूतगिरणीत घुसली एसटी बस

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (20:15 IST)
जळगावातील चोपडा गावाजवळ एक बस खराब रस्त्यामुळे थेट सूतगिरणीत घुसल्याने अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. यावेळी बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी होते, मात्र ते बालंबाल बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा आगाराची बस ही चोपडा येथून नाशिकच्या दिशेने निघाली होती. मात्र थोडे दूर गेल्यावर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यातच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगा-यामुळे चालक ते वाहन काही थांबवू शकला नाही.
 
परिणामी भरधाव वेगाने धावत असलेली बस ही सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली. यावेळी बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी होते, पण ते सुदैवाने वाचले. एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने मोठी हानी टळली . अवघ्या काही सेकंदांचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या अपघातामुळे एकच खळबळ माजली आहे. तसेच या दुर्घटनेतून धडा घेऊन आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन मोठेमोठे खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

पुढील लेख
Show comments