सध्या राज्यात अवकाळी पावसाने झोडपले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू आहे. सध्या राज्यात जळगाव भुसावळ तालुक्यात सोसाट्याचा वादळी वारे वाहत आहे.. गुरुवारी दुपारी जोरदार वाऱ्यामुळे चिंचोली येथे एका इमारतीचे काम सुरु असताना उभा असलेला रिकामा कंटेनर उलटल्याने त्याच्या खाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर एक जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे एका शासकीय इमारतीचे काम सुरु असताना गुरुवारी दुपारी जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरु झाले आणि गेल्या दोन महिन्यांपासून मजूर काम करत असताना पत्र्याचे शेड उडाले घाबरून मोकळ्या मैदानात मजूर आणि अभियंता आले आणि कंटेनरच्या आडोसाला उभे राहिले. मोकळ्या मैदानात उभा असलेला रिकामा कंटेनर जोरदार वाऱ्यामुळे पालटला आणि त्याच्या खाली दबून मजूर भोला पटेल आणि अभियंता चंद्रकांत वाभळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मजूर जखमी झाला. अपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेत आणि कंटेनरला क्रेनच्या मदतीने बाजूला करून मृतदेह काढण्यात आले. जखमींना आणि मयतांना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.