मायक्रोबायोलॉजिस्टमध्ये आयसीयूचे निरीक्षण केले जाईल जेणेकरुन रोबस इनफेक्शन प्रिव्हेंशन प्रोटोकॉलचे अनुसरण करून संक्रमणाचा धोका कमी होईल.
मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने गुरुवारी ३७-बेड असलेले अत्याधुनि आयसीयू, मल्टि पॅरा मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटर लॉन्च केले. आयसीयूचे उद्घाटन मुख्य पाहुण्या श्रीमती. अमृता फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, आयसीयू संपूर्ण दोन मजल्यांवर पसरले आहे, आईसीयूमधील रुग्णाची निर्बाध काळजी घेण्यासाठी रोगग्रस्त रुग्ण विभाग, उपचार क्षेत्र, नर्सिंग विभाग, शिकवण्याचे आणि शिकण्याचे असे विभाग डिझाइन केलेले आहे. त्याचसोबत एक्स-रे, यूएसजी, २ डी इको आणि सेंट्रल लाइन प्रक्रिया यासारख्या विविध उपकरणे रुग्णाच्या बेड साइडवर चालवता येऊ शकतात. सर्व गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स याना सक्षम केले आहे. आयसीयूमध्ये डायलिसिस सुविधा देखील उपलब्ध असेल.
जसलोक हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरियान यांनी सांगितले की, "आईसीयू युनिटच्या उदघाटनाचा एक भाग म्हणून अमृता फडणवीस यांचे मी आभार मानतो, कारण त्या नेहमीच सामाजिक कार्याची जागृती करत असतात. जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर, हॉस्पिटल रुग्ण केंद्रित आणि करुणामय दृष्टीकोनासह उत्कृष्ट क्लिनिकल केअर साठी प्रसिद्ध आहे. जसलोक मधील सर्व प्रकारच्या रुग्णांना जाती व पंथ बाजूला ठेवून समान सेवा प्रदान केल्या जातात. आयसीयू उदघाटनाच्या मदतीने रुग्णालयाने पुढाकार घेऊन उच्च पातळीवर रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे."
सामाजिक कार्यकर्त्या सौ. अमृता फडणवीस म्हणाल्या कि, "या आयसीयूच्या उदघाटनाचा एक भाग म्हणून मला आनंद वाटत आहे. जसलोक हॉस्पिटल विविध सेलिब्रिटीजवर उपचार करते, त्याचबरोबर दुसरीकडे मला याचा आनंद आहे की, उपचारांसाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णावर उपचार झाल्याशिवाय तो परत जात नाही. देशामध्ये समृद्धी आणि विकास आणण्याच्या प्रयत्नातून दारिद्र्यरेषेच्या खाली असलेल्या लोकांवर सुद्धा उपचार केले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. मानवतेच्या दृष्टीने हॉस्पिटल नेहमी आपल्या सुविधा सुधारीत असल्याने हॉस्पिटलचे आभारी आहे. "
तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, आयसीयूमध्ये सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आणि उपचार करणाऱ्या प्रतिष्ठित टीम, २४ बाय ७ कार्यरत असते. कर्तव्य निर्धारित निपुणता, नर्सिंग, विशेषज्ञ, फिजियोथेरेपिस्ट, श्वसन तंत्रज्ञ, सल्लागार यासारख्या प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण टीमचा समावेश असेल. यामध्ये इन्फेक्टेड आणि नॉन इन्फेक्टेड रुग्णांसाठी वेगवेगळे युनिट असतील ज्यामुळे विशिष्ट गंभीर रुग्णांवर काळजीपूर्वक लक्ष देण्यास मदत होईल.