Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील

jayant patil
, बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:25 IST)
भाजपची मदत करण्याची मानसिकता कोणाची आहे ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशा वातावरणात कुठल्या तरी मागच्या गोष्टी काढणे हे आवश्यक वाटत नाही. एकीकडे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे काही लोक भाजपची सुपारी घेत आहेत. झोपलेल्यांना उठवणे सोपे असते मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी दिली आहे.
 
भाजप-शिवसेना या जातीयवादी सरकारच्या काळात भिमा-कोरेगावसारखी प्रकरणे झाली. मागासवर्गीय समाजातील आणि अल्पसंख्याक समाजातील लोक या युती सरकारवर संतापले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली घटना जाळण्याचे काम या सरकारच्या काळात झाले. या सरकारने घटनेतील अनेक कलमे बदलली, अशात हा सर्व समाज समविचारी पक्षांच्या आघाडी सोबतच जाणार, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारी रुग्णलयाच्या परिसरात चावा घेतला कुत्र्याने