वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून निसटून गुजरातमध्ये गेला या वरून शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात ठाकरे गट आणि विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. यावर संतप्त प्रक्रिया देत जयंत पाटीलांनी शिंदे -फडणवीस सरकारला प्रश्न विचारून टीका केली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन सोडणार असे त्यांनी विचारले आहे. वेदांता पाठोपाठ पुन्हा एक अजून प्रकल्प थेट गुजरात कडे गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झाल्याचं जयंत पाटीलांनी आणि आदित्य ठाकरे यांनी टीका केली असून राज्यातून मोठे प्रकल्प गुजरात कडे जात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त पाहत आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरून उद्योग मंत्री उदयसामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.या प्रकरणावरून आदित्य ठाकरे, जयंत पाटील, आणि रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.