नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ भागात सिंदी दिगर घाटात प्रवासी वाहतूक जीप कोसळल्याने आठ प्रवाशांचा मृत्यू झाला.आणि 15 प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले या जीप मध्ये एकूण 30 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.
हा अपघात सायंकाळी सिंदी दिगर घाटात घडला.ही प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळी या घाटात कोसळली.या मध्ये 30 प्रवासी होते.हा अपघात इतका भीषण होता की दरीत जीप कोसळून जीपचा चुरडा झाला.या अपघातात 8 जण मृत्यू मुखी झाले तर 15 पेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या अपघातात मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
पंत प्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.मृतककांच्या नातेवाईकांना 2 लाखाची मदत देण्यास आली आहे.तसेच जखमी झालेल्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.