Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडेरायाच्या जेजुरीचा फोटो ठरला जगाज सर्वोत्तम

Maharashtra news
महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणार्‍या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडार्‍यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो 2017 सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो ठरला आहे. 
 
जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्त्रोत असलेल्या विकीपिडियाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे. #WikiL0-es Monuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते. यामध्ये 45 हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले. केवळ भारतातूनच सात हजारांहून अधिक फोटो या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी भाषा दिन विशेष : कुसुमाग्रज