rashifal-2026

दानवेंच्या वक्त्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जोडे मारो आंदोलन

Webdunia
ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या छातीवर गोळी मारण्याऐवजी पायावर गोळी मारू शकत होते असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांच्या नेतुत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
 
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरली आहे. शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन व रस्तारोको केले होते. शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच शेतकऱ्यांवर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारात दोन शेतकऱ्यांना गोळी लागली असून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार न करता हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता. आंदोलन रोखण्याचे अनेक पर्याय असताना गोळीबार हा पर्याय होवूच शकत नाही हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे या गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यात रावसाहेब दानवेनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारण्याचे केलेले वक्तव्य अतिशय अशोभनीय असून यातून हेच स्पष्ट होते कि शेतकऱ्यांना गोळीमारा. यामुळे दानवेनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

देशभरात हवामानात बदल मेघगर्जना, पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान

देशातील ही चार प्रमुख विमानतळे २९ मार्चपासून बंद राहणार, हवाई दलाने मोठा निर्णय घेतला

LIVE: यवतमाळमध्ये पोटनिवडणुका जाहीर

यवतमाळमध्ये पोटनिवडणुका जाहीर! ४७ ग्रामपंचायतींमध्ये २८ एप्रिल रोजी मतदान होणार

छत्रपती संभाजीनगर मध्ये घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापरावर कारवाई

पुढील लेख
Show comments