Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भाजपच्या सत्ता काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले- पवार

भाजपच्या सत्ता काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले- पवार
, सोमवार, 28 मार्च 2022 (09:57 IST)
काश्मीर मधून काश्मीर पंडित बाहेर पडले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्यावळी व्ही. पी. सिंह यांची सत्ता होती. भाजपचे त्यांना सहकार्य होते. म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.
 
माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, "विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु, टीका करताना त्यात उद्वेष नसायाला हवा. मात्र अलीकडे ते पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय? असं वाटत आहे. काश्मीरमधील एक घटक निघून गेला.
 
"त्यावर एक सिनेमा आला, त्यानंतर काँग्रेसवर टीका झाली. परंतु, यामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं, समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते. 

पंतप्रधानांकडून त्यावर भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पन्नी केली जाते. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bharat Band: आज आणि उद्या भारत बंदचा बँकिंग-विम्यापासून या सर्व सेवांवर होणार परिणाम