Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी

politician and senior leader of the NCP eknath khasdse
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (21:30 IST)
पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 
 
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणं त्यांनी टाळलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन