Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही-कालीचरण महाराज

Kalicharan Maharaj made another controversial statement
, सोमवार, 26 डिसेंबर 2022 (08:33 IST)
कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. 
 
“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?” असे सवाल कालीचरण महाराज यांनी केले आहेत.
 
“आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही,” असेही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुनिषा शर्माची आत्महत्या लव्ह जिहाद असेल तर…भाजप आमदार राम कदम यांचा इशारा