Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किशोर आवारे खून प्रकरण : किशोर आवारे खून प्रकरणातील मास्टर माईंड भानू खळदे याला अटक

arrest
, रविवार, 9 जुलै 2023 (12:43 IST)
तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील मास्टर माईंड चंद्रभान आणि भानू खळदे याला नाशिकांतून अटक केली आहे. भानू खळदे हा मुख्य आरोपी असून मागील दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 
 
चंद्रभान खळदे माजी नगरसेवक असल्याने त्याच्याबद्दल कोणतीच माहिती पोलिसांना नव्हती. पोलिसांनी त्याच्या मित्र आणि नातेवाईकांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरु केले. मुख्य आरोपी विविध ठिकाणी लपून फिरत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. गुंडा विरोधी पथकाला आरोपी नाशिक शहरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.   
 
किशोर आवारे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यात प्रामुख्याने सुपारी देणारे चंद्रभान खळदे व त्याचा मुलगा गौरव खळदे तसेच सुपारी घेणारे शाम अरूण निगडकर,प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे, आदेश विठ्ठल धोत्रे, संदीप उर्फ नण्या विठ्ठल गोरे, श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल, मनीष शिवचरण यादव अशा आठ आरोपींचा समावेश आहे.
 
पोलिसांनी खळदे याचा मुलगा गौरव खळदे याला आधीच अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी तो नसून त्याचे वडील चंद्रभान खळदे आहे, हे पोलिसांच्या तपासात उघड झाले. मात्र खुनानंतर चंद्रभान खळदे हा तळेगाव दाभाडे इथून पसार झाला होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात सुरुवातीला खळदे हा खंडाळा येथे नंतर यवत व तेथून थेट हैदराबाद येथे जाऊन लपल्याचे पोलिसांना समजले. हैद्राबाद येथून तो थेट नाशिक येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Karnataka: कर्नाटकात बेपत्ता जैन मुनींची हत्या, आरोपींना अटक