Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोरराजे-निंबाळकर

Kishore Raje-Nimbalkar as the Chairman of Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोरराजे-निंबाळकरMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi News
, शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:10 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोरराजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी काढली. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
 
महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असं पत्रकातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील 11 हजार 549 एस टी कर्मचारी कामावर हजर