कोल्हापूर-पुणे हे तब्बल 270 किमीचं अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं आहे (Pune heart transplant). 150 मिनिटं म्हणजे फक्त अडीच तास. इतक्या वेळेत गाडीने ट्रॅफिकमुळे मुंबईतल्या मुंबईत फिरणंही किती मुश्किल आहे ते तुम्हाला माहितीच आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणंही मोठं आव्हानच. मग दोन जिल्ह्यातील अंतर इतक्या कमी वेळेत पार करणं हे अशक्यच. पण एका धडधडत्या हृदयाने मात्र
अवयवदान, अवयव प्रत्यारोपण याबाबत तुम्हाला आता माहिती असेलच. असंच अवयदान आणि अवयवप्रत्यारोपण पुणे आणि कोल्हापुरात झालं आहे.
कोल्हापूरच्या देवळेतील 25 वर्षांचा तरुण. ज्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या कुटुंबात त्याचे पालक आणि एक भाऊ आहे. त्यांनी त्याचे अवयव प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिली. त्याचं यकृत आणि एक किडनी कोल्हापुरातील अॅस्टेर आधार रुग्णालयात देण्यात आली. तर दुसरी किडनी पुण्यातील पुणा रुग्णालयात पाठवण्यात आली. हृदय सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आलं.