नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात प्रेक्षक गोंधळ घालतात. गौतमी पाटील नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात विविध उपक्रम राबवले जातात. काही ठिकाणी विविध देखावे उभारले जातात. या काळात कार्यक्रम होतात. सध्या कोल्हापुरात लेझरशो कार्यक्रमावर बंदी घातली आहे.
कोल्हापुरात सध्या गौतमीच्या कार्यक्रमाला देखील बंदी घालण्यात आली आहे. गणपतीत काही मंडळ साउंड सिस्टीमवर नको ते गाणे वाजवतात. गणपती हा आराध्य देव आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी आणि त्याच्या आगमनाची वाट लहानांपासून मोठे बघतात. कोणताही उत्सव असो पोलिसांचे काम वाढते. परिसरात शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते आपले कर्तव्य बजावतात. या उत्सवात काही गोंधळ होऊ नये या साठी कोल्हापुरात पोलीस दलाने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. कोल्हापुरात करवीर आणि राधानगरी तालुक्यात गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम होणार होता. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. ही माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांनी दिली.