कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोर कायम सुरु आहे. त्यामुळे अनके लहान नद्या नाले यांना पूर आला आहे. यामध्ये पाऊस उत्तम झाल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाची अशी असणारी मुख्य नदी म्हणजे पंचगंगेला पूर आला आहे. जसा पाऊस वाढतो आहे तशी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. या पावसामुळे जवळपास 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर नदीला जो पूर आला आहे त्यामुळे 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये पाच तालुक्यांत आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. तर जोरदार पावसामुळे गगनबावडा ते कळे मार्गादरम्यान 5 खासगी बस अडकल्या आहेत. तर रात्री 1 वाजल्यापासून जवळपास अडीचशे प्रवासी अडकले आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन मदत कार्य सुरु केले असून अनेक ठिकाणी धोका असलेल्या जागेपासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.