Marathi Biodata Maker

सॉरी... मला माफ करा, मी चोरी करतोय!

Webdunia
कोल्हापूर- सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून एका चोराने धूम ठोकली. या चोरट्याने कोल्हापुरातील मंगळवार पेठेत, पाण्याच्या खजिन्याजवळील पशूसंवर्धन कार्यालयात चोरी केली. या चिठ्ठीची चर्चा सध्या शहरभर जोरदार सुरू आहे.
 
पाण्याच्या खजिना परिसरात पशूसंवर्धन विभागाचे मुख्य कार्यालय आहे. रविवारी येथे एक चोर शिरला. पण शासकीय कार्यालयात त्या चोरीला काय मिळाले असेल? असा प्रश्न पडला असेल. हा प्रश्न चोरालाही पडला असावा आणि म्हणून त्याने या कार्यालयातील तीन संगणक, झेरॉक्स मशीन असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला.
 
आता केवळ हा चोर चोरी करून थांबला नाही, तर त्याने या कार्यालयातील एका टेबलावर सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. सोमवारी कर्मचारी कार्यालयास आल्यानंतर हा प्रकार उडघकीस आला.
 
ही चोरी एखाद्या गरजू विद्यार्थ्याने केली आहे का? असा संशय पोलिसांना आहे.
 
मजेदार बाब म्हणजे या चिठ्ठीत माफी तर मागितली आहे, मात्र त्याखाली पुढील 5 वर्षांनी परत करेन, असेही लिहिले आहे. त्यामुळे पोलिसही अवाक झाले आहेत. सध्या पोलिस चोराचा शोध घेत आहेत. मात्र, या चिठ्ठीची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

८०,८८६ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन आणखी एक जहाज होर्मुझमार्गे भारतात दाखल झाले

'ऑपरेशन टायगर' : उद्धव ठाकरे गटातील अकोल्यातील चार नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत सामील

वाघाचा मार्ग अडवत त्याचा पाठलाग करून व्हिडिओ व्हायरल केला, वन विभागाने केली कठोर कारवाई; एफआयआर दाखल

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; अनियंत्रित कंटेनर ट्रक इनोव्हा गाडीवर उलटल्याने तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Legislative Assembly: 80 कालबाह्य कायदे रद्द; महाराष्ट्र विधानसभेत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला

पुढील लेख
Show comments