Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रांती रेडकर आणि यास्मिन वानखेडेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; नवाब मलिकांविरोधात केली तक्रार

Kranti Redkar and Yasmin Wankhede met Governor Bhagat Singh Koshyari; Complaint made against Nawab Malikक्रांती रेडकर आणि यास्मिन वानखेडेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; नवाब मलिकांविरोधात केली तक्रार Maharashtra News Regional Marathi News IN Webdunia Marathi
, बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)
महाराष्ट्रात क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर एक चांगलांच वाद उफाळला आहे. यामुळे हे प्रकरण आता राज्यातील राजकीय वातावरणात तंग झालं आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला  एनसीबी पथकाने अटक केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी  एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. यातच आता आज वानखेडे कुटुंबीयांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनीही त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.
 
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर , यास्मिन वानखेडे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून सतत होणाऱ्या आरोपामुळे आणि खासगी आयुष्यातील बाबी सोशल मीडियातून सार्वजनिक करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात वानखेडे कुटुंबीयांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी, धीर धरा, सत्याचा विजय होईल, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्याचे क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
 
ज्ञानदेव वानखेडे म्हणाले की, ‘आम्ही राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. आमच्यावर अन्याय होत आहे. अनेक आरोपांना आम्हाला सामोरं जावं लागलं आहे. काहीतरी कारवाई ते निश्चित करतील अशी अपेक्षा आहे. तसेच, ‘आमच्यावर अन्याय होत आहे.ही सत्याची लढाई आहे. आम्ही सत्याचे योद्धे आहोत.
राज्यपालांसमोर आम्ही आमची परिस्थिती मांडली.आमच्या कुटुंबावर होणाऱ्या चिखलफेकीची माहिती दिली.मलिक करत असलेल्या बेताल आरोपांबद्दल सांगितलं.आमच्यावर जे काही आरोप झाले त्यामुळे आम्ही रडण्यासाठी राज्यपालांकडे नाही गेलो,राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, आमचं मनोबल वाढलं असून राज्यपालांनी आम्हाला धैर्य राखण्याचा सल्ला दिला,अशी माहिती क्रांती रेडकर  यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमी दर्जाच्या मद्याची ब्रँडेड बाटल्यांमधून विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई