भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, प्रतिसरकारची स्थापना करणारे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीकारी हौसाबाई पाटील यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. हौसाबाई पाटील यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील यांच्यावर हणमंतवडिये या गावात शासकीय नियमात पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.
स्वातंत्र्यानंतर वंचितांना न्याय देण्यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून हौसाताई पाटील यांची ओळख होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, प्रतिसरकारची स्थापना करणारे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या म्हणून क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील यांची ओळख होती. हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंहाच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता.