Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनीषा भांगे यांना कृषिभूषण पुरस्कार

Krishi Bhushan
सोलापूर , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:34 IST)
माढा तालुक्यातील खैरेवाडी येथील मनीषा भागवत भांगे यांना अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे व फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
बार्शी येथे होणार्या 17 व्या ग्रामीण साहित्य समेंलनात अखिल भारतीय साहित्य समेंलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भांगे यांनी तीन गुंठा शेती मॉडेल विकसित केली आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांपासून त्या सेंद्रिय पध्दतीने  शेती करत आहेत. गावरान बियांची बँकदेखील त्यांनी तयार केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावध राहा, भारत पलटवार करण्यात सक्षम : नासीर हुसेनचा इंग्लंडला इशारा