Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णकुंजवर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Krishnakunj raj thakare
, बुधवार, 27 जून 2018 (14:25 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप त्याने केला आहे. सदरच्या शिक्षकाला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 
संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकाने केला आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने एका पत्रात लिहिल. त्यानुसार शिक्षक दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काहीतरी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह