janma asthmi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 13 August 2025
webdunia

नागपूर : ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत घोटाळा उघड, बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले

Chandrashekhar Bawankule
, गुरूवार, 5 जून 2025 (10:59 IST)
Nagpur News: ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला आहे. आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. अशी महिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.
तसेच म्हाडाने बिल्डर मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेडला व्हिला आणि फ्लॅट्सची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहे. ही योजना शहराच्या हद्दीबाहेर वानाडोंगरी (हिंगणा) परिसरात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्रातील अमरावतीला ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप