Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लातूर वर पुन्हा जलसंकट, एन पावसाळ्यात धरणात फक्त ८ टक्के पाणी साठा शिल्लक

लातूर वर पुन्हा जलसंकट, एन पावसाळ्यात धरणात फक्त ८ टक्के पाणी साठा शिल्लक
, सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:07 IST)
लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के शिल्लक आहे. मत साठ्यासह हे पाणी ५५ दश लक्ष घनमीटर इतके होते. हे पाणी पुढचे वर्षभर पुरु शकते. पावसाळा सुरु आहे पण अद्याप धरणात पाण्याची आवक नाही. या धरणावर लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज, धारुर, मुरुड आणि लातूर एमआयडीसी आदी गावे अवलंबून आहेत. दरम्यान वरवंटीचे जलशुद्धीकरण केंद्रही चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या राजधानी टाकीवरुन सकाळी पाणी सुटायला हवे पण मध्यंतरी दोन दिवस वीजपुरवठा खंडीत झाल्याने हे पाणी येण्याची शक्यता केवळ ५० टक्के आहे अशी माहिती जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख विजय चोळखणे यांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

३१ देश ६०० सायकलवरून भ्रमण, जगात माणुसकी हा सर्वात मोठा धर्म - योगेश गुप्ता