एका अनोळखी कॉलने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात खळबळ उडाली आहे. पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने माहिती दिली की गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येणार आहे जिथे तो मोठी घटना घडवून आणणार आहे. इतकंच नाही तर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस दादर रेल्वे स्टेशनवर येणार असल्याचंही फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफसह सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. सध्या मुंबई पोलीस कॉल करणारी व्यक्ती आणि त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
बुधवारी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एक कॅब आली आणि ड्रायव्हरने विचारले की लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? त्याच्यासाठी कॅब आली आहे. लॉरेन्स बिश्नोई यांचे नाव ऐकताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळलं की सलमानच्या अपार्टमेंटमध्ये कॅब पाठवणारा व्यक्ती रोहित त्यागी आहे.
रोहित त्यागीने ऑनलाइन कॅब बुक केली होती. त्याला गाझियाबाद येथून अटक करण्यात आली. त्यागीच्या म्हणण्यानुसार, त्याने हे प्रँक करण्यासाठी केले. रोहित त्यागीला आयपीसी कलम 505 आणि 290 अंतर्गत अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.