Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 26 May 2025
webdunia

खून प्रकरणी पुणे येथील माजी नगरसेवकाच्या दोन मुलांना जन्मठेप

life imprisonment
, शनिवार, 20 जुलै 2019 (09:45 IST)
पुणे येथील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरूणाचा खून केल्या प्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांना शिवाजीनगर येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, चेतन तानाजी निम्हण व तुषार तानाजी निम्हण अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांनी  एप्रिल 2013 मध्ये चेतन आणि तुषार यांनी भावकीतील वादातून प्रतिक रामभाऊ निम्हण (19) याचा गोळया झाडून खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. खून प्रकरणी पोलिसांनी काही जणांना तात्काळ अटक केली होती तर चेतन आणि तुषार हे दोघे फरार झाले होते. त्यांना नंतर अटक करण्यात आली होती. सन 2013 पासुन हे प्रकरण चालु होते. अखेर आज शिवाजीनगर येथील न्यायालयाने चेतन आणि तुषार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिमुकली आजारी असतांना रडते म्हणून आईने केली तिची हत्या